Aarya Jadhav Team Lokshahi
मनोरंजन

Nauvari Rap Video : विदर्भातील 'या' पोरीने देशाला लावलयं वेड, नऊवारी व नथ घालून केला रॅप

नऊवारी परिधान केलेल्या एका तरुणीनं अख्खा देशाला वेड लावलं आहे.

Published by : shweta walge

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नऊवारी परिधान केलेल्या एका तरुणीनं अख्खा देशाला वेड लावलं आहे. या मुलीनं कुठलाही डान्स, कुठलाही स्टंट न करता केवळ आपल्या रॅपच्या जोरावर लोकांना वेड लावलं आहे.

हिप हॉप किंवा रॅप म्हंटलं की, फंकी लूक, अंगापेक्षा भोंगा मोठा वाटावी अशी स्टाईल.. मोठं टीशर्ट, गुडघ्यापर्यंत आलेली जीन्स, फंकी शूज गळ्यात चांदीच्या चैन. अशातच आता या क्षेत्रात एका मराठमोळ्या तरुणीने सर्वांना वेड लावलंय. ती मुलगी अमरावतीची आर्या जाधव अलीकडेच MTV या वाहिनीवरील Hustle २.o या कार्यक्रमात दिसून आली. या तरुणीनं चक्क पारंपारिक नऊवारी साडीत रॅपिंग केली आहे. हे रॅप ऐकून तुमचे पाय देखील आपोआप थिरकू लागतील.

नऊवारीत रॅप करणारी तरुणी आहे कोण?

या तरुणीचं नाव आर्या जाधव असं आहे. ती मुळची अमरावतीची आहे. करोना काळात तिला रॅपची कल्पना सुचली. घराच्या छतावर बसून तिने रॅप लिहायला सुरुवात केली. हळूहळू मोबाईलवर शूट करून ती आपल्या सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर करू लागली. QK या नावाने तिने आपले युट्युब चॅनेलही सुरु केले. ती सध्या हसल 2.0 या संगीत शोमध्ये झळकतेय. या शोमध्ये तिने हे नऊवारीवरचं रँप सॉंग गायलं होतं. हे गाणं ऐकून परिक्षक देखील थक्कच झाले. तिच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा