मनोरंजन

Prathamesh Parab: आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला; 'दगडू' चं लग्न ठरलं!

'आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला', दगडूचा हा डायलॉग त्याच्या खऱ्या आयुष्यात साकार होत आहे.

Published by : Team Lokshahi

'आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला', दगडूचा हा डायलॉग त्याच्या खऱ्या आयुष्यात साकार होत आहे. 'टाइमपास' या चित्रपटातून दगडूची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता प्रथमेश परबला त्याच्या खऱ्या आयुष्यात प्राजूची कायमस्वरूपी एण्ट्री झाली आहे. लवकरच दगडू उर्फ प्रथमेश गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्न करणार आहे. सोशल मीडियाद्वारे प्रथमेशने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या काही काळापासून प्रथमेश आणि क्षितिजा दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. नुकताच प्रथमेश आणि क्षितिजा यांचा केळवण पार पडला आहे. फोटो पोस्ट करत प्रथमेशने लग्नाची घोषणा केली आहे.

'#क्षितिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (ता. क. – तारीख खूपच स्पेशल आहे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. कमेंटमध्ये अंदाज व्यक्त करा. तोवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)', असे प्रथमेशने केळवणाच्या फोटोसोबत लिहिले आहे. या फोटोवर नेटकऱ्यांसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स करत प्रथमेश आणि क्षितिजाला शुभेच्छा दिले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने त्याच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. प्रथमेश हा फॅशन मॉडेल क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत. 'टाइमपास' या चित्रपटात 'दगडू'ने 'प्राजू' चे प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्याची ही अनोखी प्रेमकहाणी सर्वांना खूप आवडली होती. खऱ्या आयुष्यात आता प्रथमेश क्षितिजासोबत संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रथमेशची गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी क्षितिजा ही फॅशन डिझायनर आहे. त्यासोबत क्षितिजा बायोटेक्नॉलॉजिस्ट सुद्धा आहे. प्रथमेशला ‘टाइमपास’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटांशिवाय प्रथमेशने 'टकाटक १', 'टकाटक २', '३५ टक्के काठावर पास', 'बालक पालक' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा