मनोरंजन

Shantit Kranti 2 Trailer: तीन दोस्तांची धमाल कथा ‘शांतीत क्रांती २’ चा भन्नाट ट्रेलर रिलीज

आता शांतीत क्रांती आवडणाऱ्यांसाठी खुशखबर! शांतीत क्रांतीचा दुसरा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर भेटीला आलाय.

Published by : Team Lokshahi

शांतीत क्रांती ही वेबसिरीज प्रचंड गाजली. शांतीत क्रांती ही मराठीतली पहिली वेबसिरीज जी OTT प्लॅटफॉर्मवर आली होती. ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाजे, अभय महाजन अशा कलाकारांनी शांतीत क्रांतीचा पहिला सीझन गाजवला.

आता शांतीत क्रांती आवडणाऱ्यांसाठी खुशखबर! शांतीत क्रांतीचा दुसरा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर भेटीला आलाय.

शांतीत क्रांती सीझन 2 या वेबसीरिजमध्ये ललित प्रभाकरने (Lalit Prabhakar) प्रसन्‍न ही भूमिका साकारली आहे. तर दिनार ही भूमिका अलोक राजवडेनं साकारली आहे. तसेच या वेब सीरिजमधील श्रेयस ही भूमिका अभय महाजन यानं साकारली आहे.

ललित प्रभाकरने शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, 'मंडळी तुमचे आवडते त्रिकुट परत येतंय तुमच्या भेटीला आणि ते पण डब्बल मज्जा आणि मस्ती सकट. आता हा प्रवास होणार आहे अजून धमाकेदार. तर तयार रहा एक कडक प्रवासासाठी!'

भडिपासह सहयोगाने टीव्‍हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शांतीत क्रांती सीझन 2 चे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये आणि पौला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'शांतीत क्रांती 2 ही वेब सीरिज 13 ऑक्टोबरपासून सोनी लिव्‍ह या अ‍ॅपवर स्ट्रीम होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा