मनोरंजन

House of the Dragon Season 2: बहुप्रतिक्षीत वेबसिरीज 'हाऊस ऑफ द ड्रॅगन सिझन २' चा ट्रेलर प्रदर्शित

जिओसिनेमाने नुकतीच 'हाऊस ऑफ द ड्रॅगन सिझन २' च्या अधिकृत ट्रेलरची घोषणा केली आहे.

Published by : Sakshi Patil

जिओसिनेमाने नुकतीच 'हाऊस ऑफ द ड्रॅगन सिझन २' च्या अधिकृत ट्रेलरची घोषणा केली आहे. 'हाऊस ऑफ द ड्रॅगन सीझन २' फक्त जिओसिनेमा प्रीमिअमवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही वेबसिरीज इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. तर या सीरिजचा प्रत्येक भाग १७ जून पासून दर आठवड्याला सोमवारी प्रदर्शित होईल.

मॅट स्मिथ, ऑलिव्हिया कुकी, एमा डीआर्क, एव्ह बेस्ट, स्टीव्ह टुसेंट, फेबियन फ्रँकेंल, इवान मिशेल, टॉम ग्लेन-कार्नी, सोनोया मिझुनो आणि रायस इफान्स यांच्या प्रमुख भूमिका यात आहे. त्याचसोबत हॅरी कोलेट, बेथनी अँटानिया, फोब कॅम्पबेल, फिया सबान, जेफरसन हॉल आणि मॅथ्यू नीधम हे कलाकार पुन्हा नव्या सीझनमध्ये दिसणार आहे. तर, अबुबकर सलिम, गेएल रन्किन, फ्रेडी फॉक्स, सिमॉन रसेल बेल, क्लिंटन लिबर्टी, जेमी केना, केरेन ब्यू, टॉम बेनेट, टॉम टायलर आणि विन्सेंट रेगन हे नवे चेहरे यावेळी दिसतील.

ही वेबसिरीज जॉर्ज आर.आर. मार्टिन यांच्या ‘फायर अॅण्ड ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. ज्यामध्ये 'हाऊस ऑफ तरगार्येनची' कथा आहे. राजकीय कारस्थाने, कौटुंबिक हेवेदावे आणि काटेरी सिंहासनावर बसण्यासाठीच्या स्पर्धेत नागरी युद्धाची गडद छाया अशा पार्श्वभूमीवर राजघराण्यात सुरू असलेला सत्तेचा आणि ताकदीचा खेळ यात पाहायला मिळणार आहे. सात राज्यांवर ताबा मिळवण्याची भावना ठेऊन इथे प्रत्येक जण प्रयत्न करतोय. जिओसिनेमा प्रीमिअमच्या आधारे ही वेबसिरीज अमेरिकेतही पाहता येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा