मनोरंजन

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सिनेमाचा ट्रेलर अखेरीस रिलीज होताच काही मिनिटांतच सर्वत्र ट्रेंड करत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सलमान खानने आपला आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सिनेप्रेमी या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, जानेवारीमध्ये या चित्रपटाचा पहिला टीझर दर्शकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासूनच, चाहत्यांमध्ये या फॅमिली एंटरटेनर चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल उत्सुकता वाढू लागली. अशातच, सिनेमाचा ट्रेलर अखेरीस रिलीज झाला असून काही मिनिटांतच हा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड करत आहे.

ट्रेलरची सुरुवात संस्कृत श्लोकांपासून झाली असून पूजा हेगडे आणि सलमान खान यांच्या उत्तम केमिस्ट्री दिसून येते. तसेच, तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये फॅमिली इमोशन्स, कॉमेडी, रोमांस, ड्रामा, संगीत आणि अर्थातच अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळते.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र