मनोरंजन

अमिताभची भूमिका अन् अजय देवगण दिग्दर्शित ‘रनवे 34’ चा ट्रेलर रिलीज

Published by : Team Lokshahi

सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांचा 'रनवे 34' (Runway 34) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अजय देवगण 'रनवे 34' मधील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही अवतारांमध्ये तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. अजय देवगणचा हा चित्रपट या ईदला Eid रिलीज होतोय.

रनवे 34 ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. 'रनवे 34′ प्रामुख्याने कॅप्टन विक्रांतवर (Captain Vikrant) आधारित आहे. या चित्रपटात विक्रांत खन्नाची (Vikrant Khanna) भूमिका अजय देवगणने साकारली आहे, जो पायलटची (pilot) भूमिका साकारत आहे. चित्रपटात अजय देवगणचे विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ (Take off) केल्यानंतर खराब हवामानात वादळात अडकते.

आकाशात खराब हवामानात अडकलेल्या फ्लाइटमध्ये अजय देवगणसोबत अमिताभ बच्चनही आहेत. ट्रेलरमध्ये trailer अजय देवगण त्याच्या को-पायलटसोबत विमान बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगणच्या सह-पायलटच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) देखील आहे.

रनवे 34' ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगणच्या एफफिल्म्सने केली आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती कुमार मंगत पाठक, विक्रांत शर्मा, संदीप हरीश केवलानी, त्रलोक सिंग जेठी , हसनैन हुसैनी आणि जय कनोजिया यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला