Beast Movie Poster Lokshahi
मनोरंजन

विजय थलापतीच्या 'बिस्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

विजय थलापतीच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Published by : Team Lokshahi

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) 'बीस्ट' (Beast) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीपकुमार (Nelson Dilip Kumar) यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'बीस्ट' सिनेमात विजय थलापती आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर विजय थलापती, नेल्सन दिलीपकुमार आणि पूजा हेगडेने सोशल मीडियावर (social media) शेअर केला आहे.

'बीस्ट' सिनेमात विजय थलापतीसह पूजा हेगडे, सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'बीस्ट' सिनेमात अँक्शनचा (action) तडका असणार आहे. ट्रेलरमध्ये विजय थलापती अँक्शन करताना दिसत आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेची फक्त एक छोटीशी झलक यामध्ये दिसत आहे. हा सिनेमा 13 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा