मनोरंजन

उर्फी जावेदला हात लावला तर याद राखा; तृप्ती देसाईंचा चित्रा वाघ यांना इशारा

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादात आता तृप्ती देसाईची एन्ट्री

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी उडी घेतली आहे. तृप्ती देसाईंनी उर्फी जावेदचे समर्थन केले आहे. तर, उर्फी जावेदला हात लावला तर आम्ही पुढे येऊ, असं थेट आव्हानच तृप्ती देसाईंनी चित्रा वाघ यांना दिले आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, केवळ उर्फी जावेदचा विरोध का होतोय? ती मुस्लिम आहे म्हणून का? मग तर मलायका अरोरा, दीपिका पदुकोण अशा कितीतरी अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर अशी कारवाई केली पाहिजे. महिलांनी कोणते कपडे घालायचे याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. तिच थोबाड रंगावणं म्हणजे कायदा हातात घेणं. तुम्ही तिला हात तर लावून दाखवा आम्ही पुढे येऊ, असा इशाराच त्यांनी दिला आहे. अनेक आदिवासी महिला देखील आहेत ज्या केवळ साडी नेसतात ब्लाउस नाही. त्यांना आपण नांगट तर म्हणत नाही ना, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

मला तर ही उर्फट बाई कोण आहे, हे माहितही नाही. हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. अशा या उघड्या-नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही. ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन. काय व्हायचं, ते होऊद्या, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर घणाघात केला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा