मनोरंजन

Tughlaq Durbar| लवकरच नेटफ्लिक्सवर चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला…

Published by : Lokshahi News

'तुघलक दरबारचा' (Tughlaq Durbar) प्रीमियर ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होईल. असे अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि राशी खन्ना(Rashi Khanna) यांनी जाहीर केले. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर 31 ऑगस्टला रिलीज करण्यात येईल.

दिल्ली प्रसाद दीनदयालन (Delhi Prasad Deenadayal) तुघलक दरबार या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत , हा एक मनोरंजक राजकीय चित्रपट आहे. विजय सेतुपती पार्थिबन (Parthiban)सोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. यापूर्वी या दोघांनी विघ्नेश शिवनच्या (Vignesh Shivan) कॉमेडी ड्रामा (comedy drama) नानम राउडी धानमध्ये (Naanum Rowdy Dhaan) भूमिका पार पडली होती. त्यामुळे हे दोघे ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेले पाहायला मिळणार आहे.

या बरोबरच विजय सेतुपतीचे (Vijay Sethupathi) सप्टेंबर महिन्यात दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'लबाम' (Laabam) गणेश चतुर्थी उत्सवाच्या अनुषंगाने सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. स्टारची आगामी हॉरर-कॉमेडी अॅनाबेल सेतुपती (annabelle sethupathi) १७ सप्टेंबर रोजी हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) येईल.

नेटफ्लिक्सवर पदार्पण करण्यापूर्वी, तुघलक दरबारचा दूरदर्शन प्रीमियर सन टीव्हीवर (sun tv) प्रदर्शित होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :19 वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश