मनोरंजन

'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक, अक्षया लवकरच अडकणार लग्नबंधनात.....

अक्षया, हार्दिकचा लग्नसोहळा लवकरच होईल संपन्न होईल

Published by : Team Lokshahi

'तुझ्या जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. या मालिकेतील जोडगोळी 'राणा-दा' आणि 'अंजलीबाई' यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीच, परंतु मालिकेत त्यांच्या प्रेमाची केमेस्ट्री जशी आपल्याला पाहायला मिळाली, तसेच ते खरया आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेदरम्यान त्यांच्या प्रेमाचे सुर जुळले.

मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली. त्यानंतर 2 मे २०२२ ला दोघांनी साखरपुडा करून प्रेक्षकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोज आणि व्हिडीओ ला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले. हार्दिकला 'हर हर महादेव' 'विरात मराठी वीर दौडले सात' या चित्रपटातून मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतर 'चला हवा येऊ द्या' मध्ये गप्पा मारत असतना असे सांगितले कि ''आम्ही पुण्यात लग्न करणार आहोत'' त्यामुळे चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादाच्या ट्रेनर ची भूमिका साकारलेली अभिनेत्री 'ऋचा आपटे' हिची मालिकेदरम्यान हार्दिक अक्षयाशी चांगलीच गट्टी जमली, त्यानंतर नुकताच ऋचा ने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, त्यात तिने अक्षया हार्दिक लग्नपत्रिकेचा फोटो वायरल केला, त्यामुळे असे स्पष्ट झाले कि, अक्षया, हार्दिकचा लग्नसोहळा लवकरच होईल संपन्न होईल.अक्षया आणि हार्दिक सोशल मिडीयाद्वारे नेहमीच चर्चेत असतात, पण आता लग्नपत्रिकेच्या फोटोमुळे आणखीनच चर्चेचा विषय बनले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा