Tunisha Sharma Team Lokshahi
मनोरंजन

Tunisha Sharma Death: तुनिषा शर्माचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या अचानक आत्महत्येमुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

Published by : shweta walge

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या अचानक आत्महत्येमुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, तुनिषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. अभिनेत्रीचे पोस्टमॉर्टम जेजे हॉस्पिटलमध्ये झाले, ज्याच्या रिपोर्टमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, पोलिसांनी या अफवा तूर्तास फेटाळून लावल्या आहेत.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, 20 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. शनिवारी तुनिषाने अलिबाबा या टीव्ही शोच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाने तिचा को-स्टार शीजान मोहम्मद खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. यानंतर रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. चार-पाच डॉक्टरांच्या उपस्थितीत अभिनेत्रीचे शवविच्छेदन करण्यात आले. यादरम्यान त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली.

तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने शीजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या आईच्या म्हणण्यानुसार, शीजनच्या चिथावणीमुळेच तिच्या मुलीने असे पाऊल उचलले. तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून शीजनविरुद्ध कलम ३०६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या हा अभिनेता चार दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?