Tunisha Sharma, Sheezan Khan  Team Lokshahi
मनोरंजन

Tunisha Sharma Suicide: तुनिषा शर्माने यापूर्वीही जीव घेण्याचा प्रयत्न केला होता! बॉयफ्रेंड शीझान खानचा धक्कादायक खुलासा

24 डिसेंबर 2022 रोजी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली होती जेव्हा त्यांना 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री, तुनिषा शर्माने तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केल्याची बातमी मिळाली.

Published by : shweta walge

24 डिसेंबर 2022 रोजी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली होती जेव्हा त्यांना 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री, तुनिषा शर्माने तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केल्याची बातमी मिळाली. तुनिषाने तिचा को-स्टार आणि कथित बॉयफ्रेंड शीझान खानच्या मेकअप रूमच्या बाथरूममध्ये जीव दिला. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत असतानाच ही हत्या असल्याचे तुनिषाच्या कुटुंबीयांचे मत असून याप्रकरणी शीजान खानला शिक्षा झाली पाहिजे. शीजान खान सध्या कोठडीत असून त्याचीही चौकशी केली जात आहे. शीझान खानने चौकशीदरम्यान तुनिशाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या शोचा मुख्य लीड असलेला आणि तुनिषा शर्माचा सह-अभिनेता आणि प्रियकर असलेल्या शीझान खानला ''अबेटमेंट टू सूसाइड''च्या आरोपाखाली पोलिस कोठडीत घेण्यात आले. शीझान खानने चौकशीदरम्यान खुलासा केला की तुनिषाने यापूर्वीही स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता; तेव्हा शीजानने तीला थांबवले आणि तुनिषाच्या आईला तिची अधिक काळजी घेण्यास सांगितले.

बॉयफ्रेंड शीझान खानने केला धक्कादायक खुलासा

15 दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही शीजनने पोलिसांना सांगितले. तो म्हणतो की, आफताब आणि श्रद्धा हत्याकांडानंतर देशातील परिस्थितीने त्याला घाबरवले आणि त्यामुळेच त्यांचा धर्म आणि वयाच्या फरकामुळे त्याने तुनिशाशी संबंध तोडले. हे ब्रेकअप 15 नोव्हेंबरला झाले, त्यानंतर तुनिशा डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यामुळे तिने हे गंभीर पाऊल उचलले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा