tunisha sharma and sheezan khan
tunisha sharma and sheezan khan Team Lokshahi
मनोरंजन

तुनिषा शर्माप्रकरणी आईचा मोठा दावा; शिझान हिजाब घालण्यासाठी...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं, यावर प्रचंड चर्चा होत आहे. यानंतर कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली आहे. आता तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी शिझान खानबद्दल धक्कादायक दावे केले आहेत.

वनिता शर्मा म्हणाल्या की, तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिजान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 मिनिटानंतर अँबुलन्स आली. शिजान खानने स्वतः तुनिषाला आत्महत्या केल्यानंतर खाली उतरवल होतं. तुनिषा माझावर कधीच नाराज नव्हती. शिजानची बहीण फलक नाज तुनिषाला नेहमी शिजान खानच्या घरी घेऊन जात होती.

तुनिषाने स्वतःचा शरीरावर love of everything चा टॅटु सुद्धा बनवला होता. तुनिषा ही कधीच डिप्रेशनमध्ये नव्हती. तुनिषा आत्महत्या करणारी मुलगी नाही. शिजान खानने तुनिषाला त्यांच्या ब्रेकअपचा दिवशी कानाखाली मारली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शिजान खानला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी वनिता शर्मांनी केली आहे.

दरम्यान, तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती. आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ