मनोरंजन

सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

वाजे येथील सलमान खान याच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये दोन जणांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास मिरांगे | नवी मुंबई : वाजे येथील सलमान खान याच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये दोन जणांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजेश कुमार ओम प्रकाश गीला आणि गुरु सेवक सिंग तेजा सिंग सिख (दोघेही रा.पंजाब) अशी दोघांची नावे आहेत.

माहितीनुसार, रविवारी 4च्या सुमारास दोन इसम कोणतीही परवानगी न घेता अर्पिता फार्म हाऊसच्या मेन गेटच्या डाव्या बाजूने कंपाउंडमधून फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा रक्षकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र या दोघांनी स्वतःला सलमान खानचे चाहते घोषित केले आहे. पोलिसांनी दोघांची तपासणी केली असता फेक आधारकार्ड सापडले आहे. या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. तेव्हापासून सलमानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी सलमान खान नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्थेत असतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड