'पापा कहते है बडा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा' हे गाण 90 च्या शतकामध्ये गाजवणारे उदित नारायण मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी सोशल-मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिला चाहतीच्या ओठांचे चुंबन घेतले होते. हे प्रकरण चांगलेच तापले होते. पण आता उदित नारायण यांनी स्व:लाच ट्रोल केल आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉंन्चवेळी चित्रपटाच्या नावावरुन त्यांनी स्व:लाच ट्रोल करुन घेतले. उदित नारायण 'पिंटू की पप्पी' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंन्चसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी पप्पी हा शब्द ऐकला आणि किस प्रकरणावरुन आपले मौन सोडलं. यावर उदित नारायण यांनी भाष्य केले.
उदित नारायण यांनी सोडलं मौन
उदित नारायण म्हणाले की, "काय सिनेमाचं शिर्षक आहे... शिर्षक तरी बदलायल पाहिजे होतं.. पप्पी ठिक आहे.. तुमच्या चित्रपटाचं नाव 'पिंटू की पप्पी' पण उदित यांच्या पप्पी को नहीं है? हा फक्त योगायोग आहे. जो कधीतरी होणारच होता, तो व्हिडिओ दोन वर्ष जुना असून ऑस्ट्रेलियामधील आहे." असं उदित नारायण म्हणाले आहेत.
नेमंक किसिंग प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार "टीप टीप बरसा पानी..." हे गाणं उदित नारायण गात होते. यावेळी प्रेक्षकांमधील एक चाहती पुढे आली. आणि तिने सेल्फी घेण्यासाठी म्हणून पुढे आली. त्यानंतर तिने उदित नारायण यांच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, उदित नारायण यांनी तिच्या ओठांवर चुंबन केलं. या घटनेनंतर प्रेक्षक अचंबित झाले. या प्रकरणाबद्दल उदित नारायण म्हणाले, "हा व्हिडिओ 2 वर्ष जुना आहे. आणि तो व्हिडिओ ऑस्ट्रेलियामधील आहे." याआधीदेखील उदित नारायण यांनी अनेकदा व्हिडिओचे स्पष्टीकरण दिले होते.
किसिंग प्रकरणाबद्दल उदित नारायण यांची पहिली प्रतिक्रिया
"या सर्व प्रकरणाचा मला कसलाच पश्चाताप होत नाहीये. जे मी केलं यात काही गैर आहे असे मला वाटतं नाही. कारण माझं मन साफ असून जर लोकांना माझ्या चाहत्यांचं प्रेम दिसत नसेल याचं मला फार वाईट वाटतं आहे" असं उदित नारायण यांनी म्हटले आहे.
उदित नारायण हे एक प्रसिद्ध ज्येष्ठ गायक आहेत. त्यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, बंगाली, सिंधी, ओडिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामी यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, कयामत से कयामत तक, रंगीला, पुकार, धडकन, लगान, देवदास, वीर-झारा आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटांमधील त्यांची गाणी विशेष लोकप्रिय ठरली आहेत.