Rakesh Roshan Team Lokshahi
मनोरंजन

अंडरवर्ल्डने केला होता राकेशवर हल्ला; झाडल्या होत्या गोळ्या?

चित्रपटाच्या यशामुळे राकेश रोशन मृत्यूच्या जवळही पोहोचले होते.

Published by : prashantpawar1

अभिनेता, दिग्दर्शक तसेच निर्माता राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. राकेश रोशनचा त्या सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे ज्यांचे अभिनय कारकीर्द काही खास नव्हते. तरीही त्यांनी कधीच हार मानली नव्हती. राकेश रोशन हे अभिनयातील करिअरच्या कमतरतेमुळे कधीच नाराज झाले नाहीत. याउलट त्यांनी स्वत:ला दिग्दर्शनाकडे वळवले. दिग्दर्शक म्हणून त्यांची चित्रपट कारकीर्द उत्कृष्ट बनली. त्यांनी करण-अर्जुन, खून भरी मांग, किशन कन्हैया, कहो ना प्यार है, कोई मिल गया , क्रिश मालिका यांसारखे सुपरहिट चित्रपट केले.

'कहो ना प्यार है' या चित्रपटासाठी राकेश रोशन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. परंतु, या चित्रपटाच्या यशामुळे राकेश रोशन मृत्यूच्या जवळही पोहोचले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2000 साली जेव्हा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याक्षणी राकेश रोशन अंडरवर्ल्डच्या डोळ्यात अंजन घालत होते. त्याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली की त्याने चित्रपटाच्या नफ्यातील काही हिस्सा त्यांना वाटून द्यावा.

जेव्हा राकेश रोशनने हे करण्यास नकार दिला तेव्हा दोन नेमबाजांनी त्यांना धमकावण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने राकेश रोशन गंभीर जखमी झाले होते. त्यांना एक गोळी खांद्यावर तर दुसरी गोळी छातीवर लागली. तात्काळ रुग्णालयात नेल्याने राकेश रोशन यांचे प्राण वाचले आणि काही कालावधी नंतर ते बरे होऊन घरी परतले.

राकेश रोशन यांनी 2019 मध्ये आणखी एक चढउतार पाहिले. जेव्हा त्यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि त्यातून बरे झाल्यानंतर ते परत आले. सध्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर राकेश रोशन क्रिश सीरिजच्या पुढच्या चित्रपटावर काम करत आहेत आणि ते लवकरच दिग्दर्शनाला सुरुवात करतील असा अंदाज आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती