chitra wagh urfi javed  Team Lokshahi
मनोरंजन

चित्रा वाघ यांना झटका! उर्फी जावेद करणार भाजपात प्रवेश?

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. अशातच उर्फी जावेद भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना उर्फीने हे सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे चित्रा वाघ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाडच रंगवेन, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला होता. यावर उर्फीने आता प्रत्युत्तर दिले असून चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले आहे.

काय म्हणाली उर्फी जावेद?

मी भाजपा प्रवेश केल्यानंतर चित्रा वाघ यांच्याशी मैत्री होईल, यात शंका नाही. चित्रा वाघ यांना संजय यांची आठवण आहे का? आपण भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत तुमची मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका माफ केल्या. याच चुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तुम्ही रान पेटवले होते, असे म्हणत उर्फीने संजय राठोड यांच्यावरुन चित्रा वाघांना टोला लगावला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्री संजय राठोड हे चांगलेच चर्चेत राहिले होते. मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आले होते. मात्र, हे संपूर्ण प्रकरण पुढे आणण्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हात होता. परंतु, आता संजय राठोड हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणावरुन नेहमीच निशाणा साधण्यात येतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला