मनोरंजन

रणवीर सिंग लवकरच प्रेक्षकांना देणार ‘या’ चित्रपटांची मेजवानी

Published by : Lokshahi News

आपल्या पोशाखामुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता रणवीर सिंग लवकरच प्रेक्षकांसाठी अनेक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणार आहे. बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर करण जोहरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून करण जोहर दिग्दर्शित चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, याचसोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे सुद्धा दिसणार आहेत.

अभिनेता रणवीर सिंग आणखी एका दक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रीमेक मध्ये दिसणार आहे, हि भूमिका त्याच्या आतापर्यंतच्या कामापेक्षा जरा वेगळी असणार आहे, हा चित्रपट दक्षिणात्य चित्रपट 'अन्नियन' याचा हिंदी रिमेक असणार असून हा चित्रपट प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांचा असणार आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे.

यासोबतच करण जोहर त्याचा नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात देखिल अभिनेता रणवीर सिंग काम करणार आहे. रणवीरसोबत अभिनेता विकी कौशल देखील या चित्रपटात त्याच्या भावाची भूमिका साकारणार आहे आणि या दोघांसोबत अभिनेत्री करिना कपूर आणि आलिया भट देखील दिसणार आहेत. या चित्रपटात मुघलांची कथा दाखवण्यात आली असून विकी कौशल यात औरंगजेबच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...