Urfi Javed Team Lokshahi
मनोरंजन

Urfi Javed: कधी फ्लॉवर बिकिनी तर कधी काचेचे ड्रेस आता तर चक्क...

आता पुन्हा एकदा उर्फीने सर्वांनाच थक्क केले आहे

Published by : shweta walge

उर्फी (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स सर्वांनाच थक्क करतो. तिने तिच्या अप्रतिम पोशाखांनी अनेक वेळा लोकांना आर्श्चयचकित केले आहे आणि आता पुन्हा एकदा उर्फीने सर्वांनाच थक्क केले आहे.अलीकडेच उर्फी फ्लॉवर बिकिनीमध्ये (Flower bikini) दिसली होती आणि आता अभिनेत्रीने फॉइल पेपरने (Foil paper) बनवलेला ड्रेस परिधान केला आहे.

सामान्य माणूस फॉइल पेपर खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी उपयोग करतो. यातच उर्फीने फॉइल पेपरचा उपयोग वेगळ्याच प्रकारे केला आहे. उर्फी या फॉइल पेपरने बनवलेला ड्रेस घालून मुंबईच्या रस्त्यांवर दिसत आहे. यावेळी उर्फीने पापाराझींना छत्र्या आणि मिठाईचे वाटप केले. विशेष म्हणजे प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळेसही उर्फी तिच्या आउटफिटमध्ये खूप आत्मविश्वासाने दिसते.

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने हा फॉइल पेपर ड्रेस पारदर्शक जाळीपासून बनवला आहे. उर्फीने हा लूक जांभळ्या ओव्हरकोटसह पूर्ण केला.

मात्र, यावेळीही उर्फी जावेदचा हा लूक सोशल मीडियावर यूजर्सना काही विशेष आवडला नाही. उर्फीला अनेकांनी ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले, 'अरे मेडम ये भी क्यों पहना है। इतनी मेहरबानी किसके लिए।'' दुसऱ्या युजरने लिहिले, 'इसे कोई जू में डालो रे।'

उर्फीला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती पहिल्यांदा 'बिग बॉस ओटीटी'च्या (Big Boss OTT) वेळी आउटफिटमुळे चर्चेत आली होती. त्याचवेळी, शोमधून बाहेर आल्यानंतरही उर्फीने तिच्या कपड्यांसह लोकांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे ती ट्रोल होऊ लागली. मात्र, ती लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचे तिने अनेकदा सांगितले आहे. तिला तिचा फॅशन सेन्स आवडतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?