Urfi Javed Team Lokshahi
मनोरंजन

Urfi Javed : करोडोंच्या मालमत्तेची मालकीन आहे उर्फी जावेद, एका महिन्यात कमावते एवढी मोठी रक्कम

'बिग बॉस' OTT मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी जावेद सिनेजगतात तिच्या असामान्य फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Published by : shweta walge

'बिग बॉस' OTT मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी जावेद सिनेजगतात तिच्या असामान्य फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी अनेकदा तिच्या आउटफिट्स आणि बोल्डनेसमुळे नेहमीत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील केले जाते. पण हे देखील खरे आहे की, अभिनेत्री लोकांकडून होत असलेल्या टीकेला जुमानत नाही आणि ती आपले जीवन जगत आहे. दरम्यान, उर्फीच्या कमाईवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आम्ही तुम्हाला तीच्या नेट वर्थ आणि कार कलेक्शनबद्दल सांगू.

उर्फी जावेदला आजच्या काळात सर्वजण बोल्डनेसमुळे ओळखतात पण या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती 'दुर्गा', 'सात फेरे की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'दायन', 'रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. पण तीला लोकांमध्ये फक्त 'बिग बॉस' मधूनच ओळख मिळाली आहे.

कोटींची मालमत्ता

प्रत्येक वेळी उर्फी जावेदच्या कमाईबद्दल प्रश्न उपस्थित होतो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालक आहे आणि ती दर महिन्याला लाखोंमध्ये कमावते. एका रिपोर्टनुसार, उर्फी सीरियलच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये घेते आणि ती दरमहा 30 लाख रुपये कमवते. तीची एकूण संपत्ती 172 कोटी इतकी आहे.

घर आणि कार कलेक्शन

उर्फीचा जन्म लखनऊमध्ये झाला होता पण आता ती मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तीच्याकडे जीप कंपास एसयूव्ही आहे, ज्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. उर्फी या कारसोबत अनेकदा स्पॉट केली जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

Latest Marathi News Update live : पुण्यात एसटी थांबवून ठेवल्यानं वारकऱ्यांचा संताप

MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

RSS On Language Row : 'स्थानिक भाषेला प्राधान्य द्या'; भाषा वादावर RSS ची पहिली प्रतिक्रिया