मनोरंजन

Urfi Javed : उर्फी जावेदचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड; इन्स्टाग्रामने उर्फी जावेदची का मागितली माफी?

उर्फी जावेदबाबत एक बातमी समोर आली आहे. उर्फी जावेदने अलीकडेच एक इस्टास्टोरी शेअर करून चाहत्यांनाही धक्का दिला आहे. तिने चाहत्यांना सांगितले की तिचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. सोशल मिडियावर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. कधी तिच्या अतरंगी फॅशनमुळे तर कधी तिच्या बेताल वक्तव्यामुळे उर्फीची चर्चा होतेच. मात्र आता उर्फीला मोठा झटका मिळाला आहे. उर्फी जावेदबाबत एक बातमी समोर आली आहे.

उर्फी जावेदने अलीकडेच एक इस्टास्टोरी शेअर करून चाहत्यांनाही धक्का दिला आहे. तिने चाहत्यांना सांगितले की तिचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. उर्फी जावेद अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून देत असते. व्हायरल स्क्रीनशॉटनुसार आता उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. हा स्क्रीनशॉट उर्फीने स्वतः शेअर केला आहे. या इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंडिंग स्क्रीनशॉटमध्ये, मेटाने तिला अनेक सल्ले दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे तिचे खाते सस्पेंड करण्यात आल्याचे सांगितले.

महत्वाचं म्हणजे तिचे खाते सस्पेंड होऊनही दिसत आहे. यानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये तिला इन्स्टाग्रामवरून एक मेसेज आला होता की, 'तुमचे अकाउंट चुकून बंद झाले होते. जे आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. आता तुम्ही लॉग इन करू शकतात. गैरसोयीबद्दल क्षमा करावी. धन्यवाद... इंस्टाग्राम टीम. तर हा फोटो शेयर करत तिने लिहिले आहे की, 'म्हणजे तुम्हीच ठरवा.'

अनेकदा लोकांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट बॅन करण्याची मागणी केली होती. आता नेटकऱ्यांची ही इच्छा पुर्ण झाली मात्र थोड्याच वेळासाठी कारण नंतर ते रिकव्हर करण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा