मोठी बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झालाय. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.