अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही मराठी तसेच हिंदी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक हिंदी चित्रपट केले आहेत. तसेच ती तिच्या अभिनयामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत त्यात रंगीला, कौन, जुदाई यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट तिने केले आहेत. तसेच उर्मिला मातोंडकर हिने मराठी चित्रपटात देखील आपली छाप सोडली आहेत.
त्यानंतर कालांतराने तिने चित्रपटातून ब्रेक घेतला आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली. उर्मिला मातोंडकरने एका आंतरधर्मीय मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत 3 मार्च 2016 म्ध्ये लग्नगाठ बांधली. मोहसीन अख्तर मीर हा कपड्यांचा व्यसायीक आहे. नुकतेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर यांच्या घटस्फोटच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर आता वेगळे होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात येण्याची देखील माहिती मिळत आहे. उर्मिला मातोंडकर यांनी घटस्फोट घेण्यासाठी 4 महिन्यांपुर्वी कोर्टात अर्ज देखील केला असल्याची माहिती मिळतं आहे.