मनोरंजन

Vanita Kharat: वाढदिवसानिमित्त हास्यजत्रेतील वनिता खारातने सोशल मीडियावर केली 'ही' भावुक पोस्ट

सोनी मराठी या वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जाणारा कार्यक्रम बनला आहे. या कार्यक्रमाचा तसेच कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा चाहतावर्ग ही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

Published by : Team Lokshahi

सोनी मराठी या वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जाणारा कार्यक्रम बनला आहे. या कार्यक्रमाचा तसेच कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा चाहतावर्ग ही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. समीर चौगुले असो किंवा फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे हे प्रत्येक जण 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमात कुटुंबाप्रमाणे राहतात आणि प्रत्येक आनंद एकत्र मिळून-मिसळून साजरा करतात.

नुकताच हास्यजत्रेतील फेम वनिता खारात हिचा वाढदिवस झाला. तिचा हा वाढदिवस 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांसह आणि तिचा पति सुमित लोंढे याचासह साजरा झाला. यात हास्यजत्रेतील कलाकार सहभागी झाले होते. ज्यामध्ये निखिल बने, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओकार राऊत, चेतना भट यांसोबत अनेक जणांची उपस्थिती होती.

वाढदिवसानिमित्त वनिता खारातने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहले आहे, '३० वर्षांचा अनुभव, ३० वर्षे शिक्षण आणि ३० वर्षांमधली माणसं सह नवीन साहस, नवीन आव्हाने, नवीन कौशल्ये आणि नवीन कलाकुसर यासाठी सज्ज'. याचसोबत तिने लिहले, '३० वर्ष माझ्या सर्वात पहिले.... कमाई माणसांच्या प्रेमाने फुलत गेले,अशीच आणखी बहरत जाईन आणि दरवळत राहीन ! तुमच्या मित्रांची आणि आशीर्वादांची कायमची ऋणी'. या तिच्या पोस्टमध्ये वनिता खरात हास्यजत्रेतील परिवारासोबत धमाल करताना दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा