मनोरंजन

कायदा फक्त साहेबाचाच! ‘सन मराठी’ वरील ‘सुंदरी’ मध्ये वनिता खरात दिसणार ‘साहेब’ या खलनायिकेच्या भूमिकेत

‘सुंदरी’ समोर आलं ‘साहेब’ नावाचं चॅलेंज; दुसरं तिसरं कोणी नसून ही साहेब म्हणजे वनिता खरात

Published by : shweta walge

वनिता खरात हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहचलं आहे. प्रेक्षकांना पोटधरुन हसायला लावणारी अभिनेत्री वनिता खरात, आता प्रेक्षकांच्या मनात दरारा निर्माण करेल की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण वनिता खरातला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या, खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अर्थात, ती या भूमिकेमधून देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेईलच.

‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेचे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. या नवीन पर्वात सुंदरीच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरु झाला आहे आणि तिचा हा नवीन प्रवास आव्हानात्मक असणार आहे. अनेक अडचणींना सुंदरीला अगदी धीराने सामोरं जावं लागणार आहे, त्यातील एक अडचण म्हणजे ‘साहेब’.

‘साहेब’ या नावाप्रमाणेच त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व देखील भारदस्त, बेधडक, जिगरबाज असणार ना. अगदी तसंच आहे, पण ही व्यक्ती पुरुष नसून स्त्री आहे आणि ‘साहेब’ या खलनायिकेची भूमिका वनिता खरात साकारत आहे. नुकताच वनिताच्या भूमिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून वनिताला या अनोख्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार हे नक्की.

तू जरी असली कलेक्टर तरी कायदा हा साहेबाचा चालतो, या दमदार डायलॉगमुळे वनिताच्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. आता साहेब आणि सुंदरी समोरासमोर आल्यावर नेमकं काय होणार, हे पाहण्यासाठी नक्की बघा ‘सुंदरी’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त ‘सन मराठी’ वाहिनीवर.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा