Varun Dhawan  Team Lokshahi
मनोरंजन

वरुण धवन देतोय 'या' गंभीर आजाराशी झुंज; म्हणाला...

वरुण धवनला आहे वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास

Published by : Team Lokshahi

बॉलीवूडचा अभिनेता वरुण धवन सध्या एका आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे तो सध्या कमी चित्रपटांतून समोर येत आहे. वरुण धवनने वेस्टिब्युलर हायपो फंक्शनने त्रस्त असल्याचे सांगितले. या आजारात माणूस त्याच्या शरीरावरचा तोल गमवतो. यामुळे वरुणला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

वरुण धवनला आहे वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रस्त

वरुण धवनने सांगितल कि, तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शनने त्रस्त आहे. या आजारात माणूस त्याच्या शरीरावरचा तोल गमवतो. लॉकडाऊननंतर जेव्हा गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या असताना वरुणला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. स्वतःला प्रेशराइज करून त्याला काम कराव लागल आणि इच्छा नसतानाही त्याला कामातून ब्रेक घ्यावा लागला.

वरून धवनला जेव्हा स्वतःच्या या आजाराबद्दल कळले तेव्हा तो निराश झाला. स्वतःला पूढे घेऊन जाणे त्याच्यासाठी खुप चॅलेंजिंग होत. कोविड-19 नंतर जेव्हा त्याने कामाकडे परतण्याचा प्रयत्न करत असताना त्याला, अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

तो पुढे म्हणाला की, जेव्हा आपण घराचे दरवाजे उघडतो, तेव्हा तुम्हाला नाही वाटत का कि आपण त्या रॅट रेसमध्ये सामिल होण्यासाठी जात आहोत. जी घराबाहेर सुरू आहे. तो असही म्हणाला कि इथे बसल्यांपैकी किती जणाना वाटतं कि ते बदलले आहेत मी अनुभवले कि लोकं पूर्वी पेक्षा जास्त मेहनत घेत आहेत. मी फिल्म 'जुग जुग जियो' साठी स्वतःला इतकं प्रेशराइज केल कि मला कुठल्यातरी प्रमोशनमध्ये भाग घेईल असं वाटल नव्हत.

वरून धवन म्हणाला कि, काही दिवसांपूर्वी मी माझ्या मनाला समजवलं होत कि मला वेस्टिब्युलर हायपो फंक्शनचा आजार झाला आहे. मला काय झाल होत हे माहित नव्हत. पण मला हे समजल कि स्वतःला बॅलेंस करणं किती महत्वाच असतं. मी स्वतःला पुश करत राहिलो. मला वाटत कि आपण सगळे या जगात कुठल्यातरी खास हेतूने आलो आहे. मी माझा हाच हेतु शोधण्याचा प्रयत्न आहे.

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे नक्की काय?

वेस्टीबुलर हायपोफंक्शन कानाच्या आतला बैलेंस सिस्टम असतो जो नीट काम करू शकत नाही. कानाच्याआत वेस्टीबुलर सिस्टम जे डोळ्यासोबत काम करते आणि स्नायू संतुलित करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही त्यामुळे कानातून ऐकलेल्या गोष्टी मेंदूपर्यंत नीट पोहोचत नाहीत. अश्याने माणसाला चक्कर येते.

वरुण धवन लवकरच 'भेड़िया' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार असून हल्ली तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुणसह क्रिती सॅनन दिसणार असून त्यांनी शेवटच दिलवाले या चित्रपटात एकत्र काम केल होते. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला बर्‍यापैकी चांगला रिस्पॉन्स देखील मिळाला होता. तब्येत बरी नसतीनाही फिल्मच्या प्रमोशन मध्ये वरूणने कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा