मनोरंजन

वरुण धवनने उडवली अनन्या पांडेची खिल्ली; आगामी सिरीजची केली घोषणा

'प्राइम बे' आणि प्राइम व्हिडिओच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वरुण धवनची आगामी सिरीज 'कॉल मी बे'बाबत नवी अपडेट आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

'प्राइम बे' आणि प्राइम व्हिडिओच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वरुण धवनची आगामी सिरीज, 'कॉल मी बे'बाबत नवी अपडेट आली आहे. वरुणने एका मजेशीर व्हिडिओमध्ये कॉल मी बेमधील अनन्या पांडेची 'बे' म्हणून ओळख करून दिली आहे. यानिमित्ताने वरुन धवन आणि अनन्या पांडे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

या व्हिडिओमध्ये, अनन्या तिच्यातील फॅशनिस्टाला आव्हान देताना तसेच वरुण धवनला फॅशन आणि कपड्यांबद्दल शिकवताना पाहायला मिळेल. अशातच, दोघेही आपल्या अमेझॉन सिरीजची घोषणा करत आहेत, ज्याचे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे.

अरबपती फॅशनिस्टा 'बे' तिच्या अतिश्रीमंत कुटुंबाने सेलसियस घोटाळ्यामुळे नाकारले आहे. पहिल्यांदाच तिला स्वतःचा बचाव करायचा आहे. या प्रवासात, ती स्टिरियोटाइपवर मात करते, पूर्वधारणा तोडते आणि आपण खरोखर कोण आहोत याचा शोध घेते.

धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शनची 'कॉल मी बे' ही सिरीज करण जोहर, अपूर्व मेहता तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सोमेन मिश्रा द्वारा निर्मित आणि कॉलिन डी'कुन्हाद्वारा दिग्दर्शित आहे. दरम्यान, इशिता मोईत्राद्वारा क्रिएटेड, ज्यांनी समीना मोटलेकर आणि रोहित नायर यांच्यासह सिरीजचे सह-लेखन देखील केले आहे. अशातच, 'कॉल मी बे' आपल्या रिलीज नंतर 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा