Varun Dhawan,Kiara Advani Team Lokshahi
मनोरंजन

'Jug Jugg Jeeyo'च्या सेटवर वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यात जोरदार भांडण

'जुग जुग जिओ' हा चित्रपट २४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Published by : shweta walge

'जुग जुग जिओ' (Jug Jug Jio) हा चित्रपट २४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 'जुग जुग जियो'मध्ये लग्नानंतरचे बदलते नाते आणि जोडप्यामधील तणाव जवळून दाखवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्यातील भांडणाचे काही दृश्य दाखवण्यात आले आहे. पण आता खुद्द अभिनेत्याने खुलासा केला आहे की, अभिनयाच्या आधी त्यांच्यात मोठी भांडणे झाली होती. होय, चित्रपटाच्या सेटवर स्टार्समध्ये मारामारी होणे सामान्य आहे, परंतु चित्रपटाच्या सीनवर भांडणे पहिल्यांदाच घडली असावी. तर मग, वरुण-कियारा यांच्यात काय घडले ते संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

पिंकविलाशी बोलताना वरुण धवनने सांगितले की, 'चित्रपटासाठी फाईट सीन शूट करण्यापूर्वी कियारा आणि माझी २-३ वेळस भांडण झाली होती. कारण आम्ही सीनवर चर्चा करत होतो आणि आमच्या दोघांमध्ये भांडण झाले.

वरुण पुढे म्हणाला, 'कियारा म्हणत होती की मी हे बोलेन पण मी माझे मत मांडत होते. मी म्हणालो हा माझा समज आहे. एक माणूस म्हणून मी माझ्या कुटुंबासाठी कमावले पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे कारण मला लहानपणापासून तेच शिकवले जाते. कियारानेही मला डॉमिनेटिंग मॅन म्हटले. मग मी तिला म्हणालो, तुझा भाऊ आणि वडीलही असाच विचार करतात. मग मला असे वाटत असेल तर माझी चूक कशी झाली. माझ्या आई-वडिलांनी मला लहानपणापासून हेच ​​शिकवलं आहे.

अभिनेत्याने सांगितले की, आमच्यातील भांडण इतके वाढले होते की, दिग्दर्शक राज मेहता (Raj Mehta) यांना स्वतः येऊन प्रकरण हाताळावे लागले. यानंतर आम्ही दोघांनी चित्रपटाचा फाईट सीन शूट केला. तर वरुण आणि कियारा यांनी जुग जुग जियो या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकारली आहे, ज्यांच्यामध्ये फक्त भांडणे होतात. दोघांनी लव्ह मॅरेज (Love marriage) केले होते पण आता हे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू