Varun Dhavan Team Lokshahi
मनोरंजन

Varun Dhawan : 'हा' चित्रपट ठरला वरूनसाठी बिग बजेट...

हा चित्रपट वरुणच्या प्रोडक्शन व्हॅल्यूच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट असलेला चित्रपट असेल.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा सध्या त्याच्या आगामी 'बवाल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पोलंडमधील वॉर्सा येथे सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'बवाल' हा वरुणच्या प्रोडक्शन व्हॅल्यूच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट असलेला चित्रपट असेल.

चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की,प्लॅनिंगनुसार अ‍ॅक्शन सीनसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. एका दिवसाच्या शूटिंगसाठी सुमारे 2.5 कोटी खर्च येतो आणि 10 दिवसांचे शेड्यूल आहे. वरुणचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे.

सूत्रांनी पुढे असही सांगितलं की आम्ही पॅरिस, बर्लिन, पोलंड, अ‍ॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा यासारख्या महागड्या आणि मनोरंजक ठिकाणी तसेच भारतात चित्रपटाचा काही भाग शूट केला आहे. ही एक अतिशय अनोखी प्रेमकथा आहे आणि आता आम्ही वॉरसॉमध्ये एका मोठ्या अ‍ॅक्शन सीनसाठी तयारी करत आहोत. चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन हे जर्मनी शहरातील आहेत. चित्रपटाच्या क्रूमध्ये सुमारे 700 लोक आहेत. नितेश तिवारी(Nitesh Tivari) 'बवाल' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर साजिद नाडियादवाला(Sajid Nadiyadwala) हे त्याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात वरुणसोबत जान्हवी कपूर(Janhvi Kapoor)ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी ७ एप्रिल या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात