मनोरंजन

वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये वरुण धवन लांडग्यात बदलताना दिसत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये वरुण धवन लांडग्यात बदलताना दिसत आहे. वरुण व्यतिरिक्त या चित्रपटात क्रिती सेनन, अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे, तो भयपट आणि मनोरंजन दोन्हींनी परिपूर्ण आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांची पसंती मिळत असतानाच काही लोकांनी या चित्रपटाची तुलना 30 वर्षांपूर्वी आलेल्या राहुल रॉयच्या 'जुनून' चित्रपटाशी केली आहे. चित्रपट अभिनेता कमाल आर खान यानेही ट्रेलर रिलीज होताच ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्याने ट्विट करून लिहिले की, वरुण धवनने लांडग्याने चावा घेतला आहे, त्यामुळे आता वरुण रात्रीच्या वेळी लोकांना चावायला लांडगा बनत आहे.

केआरकेच्या ट्विटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने या चित्रपटाला हॉलिवूड वेब सीरिजची कॉपी म्हटले आहे. वरुण धवनचा हा हॉरर-थ्रिलर 25 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त, तो तेलगु आणि तामिळमध्ये देखील प्रदर्शित होईल. हा चित्रपट 2D आणि 3D मध्ये रिलीज होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test