Veteran Nepali Actor Sunil Thapa Passes Away at 68 
मनोरंजन

Sunil Thapa Passes Away : मनोरंजन क्षेत्रात शोककळा! प्रसिद्ध नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचे निधन

Veteran Nepali Actor Sunil Thapa Passes Away at 68: मनोरंजन क्षेत्रासाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे.

Published by : Riddhi Vanne

Veteran Nepali Actor Sunil Thapa Passes Away at 68: मनोरंजन क्षेत्रासाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे. 68 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अचानक तब्येत खालावल्यानंतर त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालय प्रशासनानुसार, सुनील थापा यांना बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले होते. सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. सुनील थापा यांनी अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत नेपाळी, हिंदी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तीनशेहून अधिक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही लक्षात ठेवल्या जातात. ‘चीनो’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे ते विशेष गाजले.

बॉलिवूडमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला. ‘मेरी कोम’, ‘द फॅमिली मॅन’ यांसारख्या प्रोजेक्ट्समधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ‘मेरी कोम’साठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. अभिनयापूर्वी ते मॉडेलिंग आणि फोटो जर्नालिझममध्ये सक्रिय होते. सुनील थापा यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली असून, चाहत्यांकडून सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

थोडक्यात

  • मनोरंजन क्षेत्रासाठी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.

  • प्रसिद्ध नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे.

  • 68 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

  • अचानक तब्येत खालावल्यानंतर त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा