मनोरंजन

विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चे शूटिंग झाले पूर्ण; 'या' दिवशी होणार रिलीज

विकी कौशल अभिनीत 'सॅम बहादूर' या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकी कौशल अभिनीत 'सॅम बहादूर' या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असून, त्यांची रिल पत्नी सिल्लूची भूमिका सान्या मल्होत्रा साकारणार आहे. तर फातिमा सना शेखला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे. अशातच, विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'सॅम बहादूर'या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

मेघना गुलजारद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट हाऊस ऑफ आरएसव्हीपी मुव्हीजच्या प्रोडक्शन अंतर्गत बनवला जात आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.अलीकडेच, चित्रपटात सॅम बहादूर यांची भूमिका साकारत असलेल्या विकी कौशलने दिग्दर्शक मेघना गुलजार सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाच्या रॅपची माहिती दिली.

'सॅम बहादूर' भारतातील सर्वात शूर वॉर हिरो आणि पहिले फील्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांची कथा आहे. यामध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तसेच, मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आरएसव्हीपी (RSVP) करत आहेत.

हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांच्या चार दशकांच्या आणि पाच युद्धांच्या लष्करी कारकिर्दीवर आधारित आहे. फील्ड मार्शल पदावर प्रमोट होणारे ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. तसेच, 1971 च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या लष्करी विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. अशातच, 'सॅम बहादूर'हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा