मनोरंजन

काय सांगता!!! ही चिमुरडी आहे विद्या बालनची मुलगी?

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. नुकतीच विद्या बालन विमानतळावर स्पॉट झाली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. नुकतीच विद्या बालन विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिच्यासोबत एक लहान मुलगीही दिसली. कारमधून खाली उतरल्यानंतर विद्याने मुलीला मिठी मारली आणि तिच्यासोबत पोज दिली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. काही युजर्सने ती विद्या बालनची मुलगी असल्याचे म्हटले आहे.

विद्या बालन व्हिडीओमध्ये या मुलीला खूप प्रेमाने वागताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण विद्याला मुलगी कधी झाली, असे विचारत आहेत. आणि तिने आतापर्यंत ती का लपवून ठेवली, तर ती विद्या बालनची चुलत बहिणीची मुलगी असू शकते, असाही अंदाज काहींनी व्यक्त केला आहे.

एका यूजरने कमेंट करत लिहिले, हे कधी झाले, तर दुसऱ्या यूजरने म्हटले, विद्या बालनलाही एवढी मोठी मुलगी होती. विद्या बालनचा हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, विद्या बालन 'मिशन मंगल' नंतर 'नियत' चित्रपटात दिसली होती. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. विद्या बालनने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. कलेसमोर सर्व काही छोटे असते हे त्यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय