मनोरंजन

रणवीर सिंगनंतर आता विद्युत जामवालचे न्यूड फोटोशूट चर्चेत, चाहते म्हणाले 'इंडियन टारझन'

Published by : shweta walge

रणवीर सिंगनंतर आता विद्युत जामवालचे न्यूड फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. विद्युत जामवालने नुकतेच त्याचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर येताच लोकप्रिय झाले आहेत. विद्युत जामवालचे हे फोटो त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत. विद्युत जामवालच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच स्टार्सही कमेंट करत आहेत.

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता विद्युत जामवालने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेता हिमालयाच्या जंगलात दिसत आहे. विद्युतने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो नदीच्या काठावर बसला आहे. दुसऱ्यो फोटोत तो नदीमध्ये उतरलेला दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये तो चुलीवर स्वयंपाक करत आहे. विद्युतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. विद्युत जामवालच्या फोटोंना इन्स्टाग्रामवर २ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

विद्युत जामवालने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हिमालय पर्वतरांगांमध्ये माझे परतणे - "देवाचे निवासस्थान" 14 वर्षांपूर्वी सुरू झाले. मला हे समजण्याआधी दरवर्षी 7-10 दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. जंगलात येताना, मला माझा एकटेपणा शोधायला आवडतो आणि "मी कोण नाही" हे जाणून घेण्याचे महत्त्व समजते. जे "मी कोण आहे" हे जाणून घेण्याची पहिली पायरी आहे तसेच शांततेत स्वतःचे रक्षण करते.'

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...