मनोरंजन

Vijay Deverakonda : रश्मिकाला म्हणतो'Darling'; रश्मिकासोबतच्या नात्यावर विजय देवरकोंडाचा मोठा खुलासा

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याने करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण 7 मध्ये सहभाग घेतला होता. विजय देवरकोंडा त्याची को-स्टार अनन्या पांडेसोबत शोमध्ये पोहोचला. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजय देवरकोंडाने रॅपिड फायर राउंड आणि लक्झरी हॅम्पर देखील जिंकले.

Published by : Team Lokshahi

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) याने करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण 7 मध्ये सहभाग घेतला होता. विजय देवरकोंडा त्याची को-स्टार अनन्या पांडेसोबत शोमध्ये पोहोचला. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजय देवरकोंडाने रॅपिड फायर राउंड आणि लक्झरी हॅम्पर देखील जिंकले.

रॅपिड फायर राउंडमध्ये बरेच मजेदार प्रश्न होते. यातील एक प्रश्न होता. मागच्या काही काळापासून विजय देवरकोंडा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या नात्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आता करण जोहरच्या चॅट शोमध्ये विजयने रश्मिकासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. करणने विजयला प्रश्न विचारला ‘तुझं नातं कॉप्लिकेटेड आहे की तू सिंगल आहे? “कधीतरी माझं लग्न होईल. त्यावेळी मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन की मी कोणावर प्रेम करतो. पण तोपर्यंत मी कोणाच्याही भावना दुखवणार नाही. माझे असंख्य चाहते आहेत. जे माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्या घरी माझे पोस्टर आहे. मोबाईल वॉलपेपरला माझा फोटो आहे. या सगळ्यांच्या भावना मला सध्या दुखवायच्या नाहीत. त्यामुळे मी सध्या तरी काहीच सांगणार नाही.”

करण जोहरने विजय देवरकोंडाला त्याच्या गर्लफ्रेंड रश्मिका मंदानाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विजय देवरकोंडा म्हणाला, “मी माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच रश्मिकासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती माझी डार्लिंग आहे आणि मला ती आवडते. माझ्यासाठी ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा तुम्ही एका चित्रपटात काम करता त्यावेळी बऱ्याच गोष्टींची देवाण- घेवाण होते. एकमेकांसोबत तुम्ही चढ- उतारांना सामोरे जाता. त्यावेळी तुमच्यात एक खास नातं तयार होतं. सामान्यपणे जेव्हा तुम्ही एकत्र काम करतो तेव्हा खूप वेगाने तुमच्यामध्ये बॉन्ड तयार होऊ लागतो. पण माझ्याबाबत हे थोडं कठीण आहे, कारण मला एखाद्या मुलीसमोर बसल्यानंतर तिच्या डोळ्यात पाहून बोलणं फार कठीण आहे.”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा