Vikram Gokhale Passes Away Team Lokshahi
मनोरंजन

Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं 77 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यात निधन झालं. जवळपास गेल्या 18 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते

Published by : Pankaj Prabhakar Rane

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यात निधन झालं. जवळपास गेल्या 18 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

विक्रम गोखले यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं.

घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता. सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत होते. विक्रम गोखले यांना 2010 मध्ये 'अलोवी' या मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सिनेविश्वात मोठे योगदान दिल्यामुळे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा