मनोरंजन

‘प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणं बंद करा’, विक्रम गोखले यांचे प्रेक्षकांना आवाहन

Published by : Lokshahi News

प्रेक्षकांनी स्वताचा चॉईस तपासून पहा! निश्चित करा! त्याच्यावर बंधने घाला.. आणि भिकार सीरीयल पाहणे बंद करा.. तुमचा वेळ वाया घालवू नका! तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सीरीयल नक्की पहा, असे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांनी सनसनाटी विधान केलं आहे.

राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना भिकार सीरीयल न पाहण्याचं आव्हान केलंय. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे, असंही ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा