मनोरंजन

जाणून घ्या ‘विरूष्का’च्या मुलीचं नाव

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क
११ जानेवारी रोजी क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. ही आनंदाची बातमी विराटने ट्विट करत दिली होती. पण त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवलं असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता अनुष्काने ट्वीट करत आपल्या मुलीचे नाव सांगितले आहे.

या ट्वीटमध्ये तिने पती विराट आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने "आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे. अश्रू हसणं आणि काळजी ह्या दोन्ही गोष्टी आम्ही एकत्र अनुभवल्या आहेत. असे कॅप्शन देत ट्वीट केले आहे. ट्वीट करत अनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असल्याचे सांगितले आहे.

त्यासोबत अनुष्काने आणखी एक ट्वीट केले आहे. यात अनुष्का म्हणाली, "तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आर्शिवादासाठी आम्ही आभार मानतो. "
विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. 'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Nikhil Bane : "Finally माझ्या आयुष्यात ती आली..." म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने केली पोस्ट शेअर