मनोरंजन

Vamika | विराट-अनुष्काच्या नेमप्लेटवर आता ‘हे’ नाव

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दोन महिन्यापूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हा पासून काही काळ अनुष्का पडद्यापासून दूर असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या लेकीचा फोटोही शेअर केले होता. विरुष्काने आपल्या मुलीचे नाव 'वामिका' ठेवले आहे. अभिनेत्रीने मार्चमध्ये वामिकाचा दोन महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांना अद्याप त्यांच्या लेकीचा पूर्ण चेहरा पाहता आलेला नाही, पण आता सोशल मिडीयावर एक फोटो चर्चेत आला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 जानेवारीला आई झाली. गरोदरपणात तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 1 फेब्रुवारीला अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या मुलीच्या जन्मानंतर पहिले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. आता विरुष्काच्या घराची नेमप्लेट चर्चेत आली आहे.

सध्या विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये खेळाडूंना घरासारखे वातावरण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी नेमप्लेटसह खोलीचे नंबरही बदलले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, कॅप्टन विराटच्या खोलीबाहेर एक खास नेमप्लेटव लावण्यात आली आहे. ज्यात विराट, त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्यांची दोन महिन्यांची लेक वामिका अशी तीन नावे आहेत. सोशल मीडियावर त्याचा एक फोटोही चर्चेत आला आहे. या नेमप्लेटवर 'वामिका'चे नाव देखील नाव लिहिलेले आहे. हा फोटो सध्या खूप चर्चेत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा