मनोरंजन

मेहंदी, हळद अन् सप्तपदी, सोनाली कुलकर्णीचा लंडनमधील शाही विवाहसोहळ्याचा व्हिडीओ पाहा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनालीने तिचा लग्नसोहळा कोरोनाच्या काळात उरकून घेतला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा लग्न सोहळ्यातील क्षण पाहता आले नव्हते. तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र आता तिच्या चाहत्यांना घरबसल्या सोनालीच्या लग्न सोहळ्यातील खास क्षण अनुभवता येणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सोनालीने पुन्हा एकदा लग्न केलं आहे. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी पुन्हा एकदा लग्न केले आहे. सोनालीने हे लग्न लंडनमध्ये केलं. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर दिसले नाहीत. मात्र आता ते आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहेत.

असे पहिल्यांदाच होणार आहे की, एखाद्या अभिनेत्रीच्या लग्नाचा व्हिडीओ चक्क ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या ११ ऑगस्टला हा सोहळा प्लॅनेट मराठीवर काही भागांमध्ये आपल्याला पहिला मिळणार आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोनाली म्हणाली की, सोनाली म्हणाली, “लग्न या गोष्टीबद्दल मला पहिल्यापासून आकर्षण होतं. अनेक अडचणी, पँडेमिक आले तरी मला चार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करायचं होतं. या सगळ्या गोष्टींवर मात करुन अखेर माझं हे स्वप्न पूर्ण होतंय.”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता