मनोरंजन

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी देशभक्ती जागवणारे 'हे' मराठी सिनेमे

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त हे काही मराठी सिनेमे पाहा.

Published by : Team Lokshahi

आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे. भारतातील तमाम लोक आज भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहेत. भारतातील कार्यालयं, शाळा आणि कॉलेज अशा अनेक ठिकाणी आज तिरंगा फडकावुन स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहेत. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त हे काही मराठी सिनेमे तुमच्या मनात घर करतील आणि तुमच्या मनात देशभक्ती जागवतील यात शंका नाही.

लोकमान्य एक युगपुरष (2015)

सुबोध भावेची प्रमुख भुमिका असलेला लोकमान्य एक युगपुरुष सिनेमा प्रचंड गाजला. आदिपुरुष सिनेमा बनवुन ज्यांनी नाराजी पत्करली अशा ओम राऊतचा हा पहिला सिनेमा.

वीर सावरकर (2001)

गायक - संगीतकार सुधीर फडके यांनी लोकांकडून मिळालेल्या देणगीतुन बनवलेला सिनेमा वीर सावरकर. २००१ मध्ये हा सिनेमा सगळीकडे रिलीज झाला.

वासुदेव बळवंत फडके (2007)

अजिंक्य देवने वासुदेव बळवंत फडके सिनेमात प्रमुख भुमिका साकारली. सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. स्वातंत्र्यासाठी मरण पत्करणाऱ्या वासुदेव बळवंत फडकेंची जीवनगाथा या सिनेमातुन दिसली.

क्रांतीवीर राजगुरु (2010)

क्रांतीवीर राजगुरु आपल्या सर्वांना माहितच आहेत. चिन्मय मांडलेकरने सिनेमात प्रमुख भुमिका साकारली होती. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी देशासाठी किती त्याग केला हे आपल्या सर्वांना माहितच आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा