Netflix|Warren Jeffs team lokshahi
मनोरंजन

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा दिसणार Netflix वर कारण...

डझनभर विवाह तर केलेच पण अनेक मुलींचे लैंगिक शोषणही

Published by : Shubham Tate

Warren Jeffs : एक माणूस ज्याला एक-दोन नव्हे तर 78 बायका आहेत. त्याच्या बायकांच्या यादीत 12 वर्षांपर्यंतच्या मुलींचाही समावेश आहे, आता त्याच्याबद्दलची माहितीपट Netflix वर प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये त्याचे सर्व अंधकारमय रहस्य उघडकीस येतील. (webseries will be screened on Warren Jeffs)

वॉरन जेफ्स असे या माणसाचे नाव आहे, सध्या ६६ वर्षीय वॉरन लैंगिक अत्याचाराप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, त्याचे अनुयायी त्याला 'प्रेषित' किंवा देवाचा दूत मानत. त्याने डझनभर विवाह तर केलेच पण अनेक मुलींचे लैंगिक शोषणही केले.

वृत्तानुसार, तथाकथित धर्मोपदेशक वॉरेन जेफ्स स्वत:ला देवाचा संदेशवाहक म्हणवत असत. 90 च्या दशकात त्यांचे 10,000 पेक्षा जास्त अनुयायी होते, त्यांनी स्वतःचा एक वेगळा पंथ चालवला. त्यांच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास 500 मुली आणि महिला राहत होत्या. यादरम्यान त्याने एका 12 वर्षीय मुलीशी लग्न केले. या लग्नाला त्यांनी 'आध्यात्मिक विवाह' म्हटले आहे.

अनेक मुलींचे लैंगिक शोषण

वॉरन जेफने एक-दोन नव्हे तर डझनभर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉरनला जवळपास 78 बायका होत्या. त्यापैकी 24 बायका फक्त 17-18 वर्षांच्या वयात मरण पावल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा