alia bhatt, ranveer kapoor Team Lokshahi
मनोरंजन

आलिया भट्टचे लग्नानंतर सेटवर जल्लोषात स्वागत

'रॉकी और रानी' की प्रेम कहानी या चित्रपटाच्या सेटवरील आलिया भट्टचे फोटो व्हायरल

Published by : shweta walge

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) गेल्या आठवड्यात १४ एप्रिल रोजी प्रियकर रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्न केले आहे. लग्नानंतर आलिया भट्ट तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्लीला रवाना झाली होती. आता चित्रपटाच्या सेटवरील आलिया भट्टचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री चुर्णी गांगुलीने (Churni Ganguly) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तुम्हाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे लीड स्टार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. चुर्णी गांगुलीने चित्रपटाच्या सेटवरील ही फोटो शेअर केली आहेत. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट सध्या दिल्लीत त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत.

करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' पुढील वर्षी 10 फेब्रुवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूरने संदीप रेड्डी (Sandeep Reddy) वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.

आलिया भट्टचे आगामी चित्रपट

आलिया भट्ट 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' या चित्रपटाव्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट 'जी ले जरा' आणि 'डार्लिंग्स' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?