मनोरंजन

सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी बॅलेतून सादर करणार ‘गंगा’चा प्रीमिअर

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजे ७५ व्या वर्षात 'आजादी का अमृत महोत्सव ' म्हणून आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी १९ मार्च २०२३ ला संध्याकाळी ६. ३०वाजता 'गंगा ' ही नृत्यनाटिका जमशेद भाभा थिएटर ,एन सी पी ए येथे सादर होणार आहे. अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारने सर्व राज्यांतील ७५ नद्या स्वच्छ तसेच पुनरुज्जीवित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना हाती घेतली आहे. गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर झालेले अवतरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . तसेच विविध सहस्त्रकातून विविध प्रदेशातून गंगा नदीचा झालेला आकर्षक प्रवास याचा आस्वाद देखील प्रेक्षकांना या नृत्यनाटिकेतून घेता येणार आहे . गंगा नदीने युगानुयुगे पाहिलेल्या विविध युगांची झलक यातून पाहायला मिळणार असून आजच्या कलियुगात ही पवित्र नदी दुर्लक्षित आणि उद्ध्वस्त अवस्थेत असल्याने ती व्यथित होण्यापर्यंतचा प्रवास यात मांडला आहे . पण गंगा माता ही जीवनदायिनी आहे . आजच्या पिढीकडून तिच्यावर झालेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून तिची शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी एक खरी आई म्हणून ती आपल्याला विनंती करत आहे.

हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या सर्व गोष्टींचे गंगा नदी हे प्रतीक आहे . हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येने राजा भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. गोमुख येथील हिमनदीच्या उगमापासून ते बंगालच्या उपसागरात प्रवाहित होणाऱ्या , भारतीय मैदानावरील लांब पल्ल्यापर्यंत गंगेने वाळूचा प्रत्येक कण पवित्र केला आहे आणि संपूर्ण प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांचे पोषण केले आहे. गंगा नदीच्या काठाने महान ऋषींना आणि कवींना जीवनातील रहस्यांचा खोलवर शोध घेण्याची प्रेरणा दिली आहे. हेमाजी म्हणतात ," आजच्या तरुण पिढीला नद्यांशी जोडणे आणि नद्यांची काळजी घेण्यास प्रवृत्त करणे , असे उदात्त ध्येय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उदात्त उपक्रमात सहभागी होताना मला अभिमान वाटतो. ‘चलीये, जानिये नदी को.’ या अभियानातील माझे योगदान म्हणजे 'गंगा ' हे चांगले संशोधन केलेले आणि कौशल्यपूर्ण नृत्य सादरीकरण सादर करणे.हे नृत्यनाट्य आम्हा सर्वांना आमच्या नद्यांची काळजी घेण्यासाठी आणि एकत्रित मानवी प्रयत्नांद्वारे त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे . हेमाजीं आपल्याला गंगा मातेच्या आकर्षक प्रवासात सामील होण्यास सांगतात आणि गंगा नदीचे मूळ वैभव कायम राखून ती आपल्याबरोबर सदैव राहील याची खात्री देतात.

या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निर्मात्या - हेमा मालिनी असून संगीत पद्मश्री रवींद्र जैन, आशित देसाई आणि आलाप देसाई यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन भूषण लकांद्री वेशभूषा नीता लुल्ला,सल्लागार देवदत्त पट्टनायक संशोधन राम गोविंद,संवाद आणि गीत पद्मश्री रवींद्र जैन आणि शेखर अस्तित्व पार्श्वगायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, मिका सिंग आणि रेखा राव यांचे आहे

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना