Yash 
मनोरंजन

'KGF 3' विषयी काय म्हणाला 'रॉकी भाई'

सिनेमाच्या तिसऱ्या भागात रॉकीच्या आयुष्यात आणि कथेत खूप काही बदल दिसणार आहेत.

Published by : Akash Kukade

केजीएफ चॅप्टर २ (KGF Chaapter2) या चित्रपटास प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

'केजीएफ चॅप्टर २' च्या पोस्ट क्रेडिट सीन दरम्यानच दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची झलक दाखवली होती. तेव्हापासूनच चाहते 'केजीएफ ३' ची वाट पहायला लागले आहेत.

प्रेक्षकांना आतापासूनच या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरता लागली आहे. सिनेमात रमिका सेननं रॉकीच्या विरोधात जे डेथ वॉरंट काढलं आहे,त्यामुळे खरंच रॉकी मरणार का? की जगावर राज्य करायचं आईचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

यशनं एका मुलाखतीत सांगितले की,आता सिनेमाच्या तिसऱ्या भागात रॉकीच्या आयुष्यात आणि कथेत खूप काही बदल दिसणार आहेत. मी आणि दिग्दर्शक प्रशांत नीलने 'केजीएफ चॅप्टर ३' साठी खूप वेगवेगळ्या सीन्सचा विचार केला आहे. खूप साऱ्या गोष्टी 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये दाखवायच्या राहून गेल्या आहेत. म्हणून आम्हाला वाटतं की खूप सारं वेगळं पाहता येईल. केजीएफ ३ मध्ये अजून चांगले सीन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा