मनोरंजन

‘आई कुठे काय करते’| अनिरुद्ध देशमुख हरवला आहे भन्नाट पोस्टर व्हायरल

Published by : Lokshahi News

छोट्या पडद्यावरील सध्याची अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.'खूप कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांनी अनेकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनिरुद्ध लवकरच संजनाशी लग्न करणार आहे. दरम्यान लग्नाच्या एक दिवस आधी अनिरुद्ध घरातून गायब असल्याचे संजना कळते. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसत आहेत. त्यांनी स्वत: 'अनिरुद्ध देशमुख हरवला आहे' अशी मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनिरुद्धाचा फोटो लावण्यात आला आहे आणि सर्वात वरती अनिरुद्ध देशमुख हरवला आहे असे लिहिण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये पुढे राहणार बोरिवली, समृद्धी बंगला, वर्ण- गोरा, उंची ५ फूट ५ इंच असे लिहिले आहे. जर अनिरुद्ध कुणाला सापडला तर संजना दीक्षितशी संपर्क करण्यासाठी तिचा नंबर देण्यात आला आहे. या पोस्टच्या खाली 'तरी हा माणूस कुणाला दिसल्यास किंवा आढळ्यास त्वरित संपर्क साधावा' असे लिहिण्यात आले आहे. तसेच माहिती देणाऱ्यास लग्नाला बोलावण्यात येईल असे देखील म्हटले आहे.

अभिनेता मिलिंद गवळीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत 'कुठे आहे अनिरुद्ध' त्याच प्रमाणे खो गये हम कहा असे म्हटले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा