Sanjay Datt Team Lokshahi
मनोरंजन

Sanjay Datt : असं काय घडलं संजयसोबत की माधुरीने घेतला 'हा' निर्णय....

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त अडकल्यानंतर अभिनेत्री माधुरीनेही त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Datt) केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक जीवनशैलीमुळेही चर्चित असतो. आज आम्ही तुम्हाला संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत. ज्याची एकेकाळी खूप चर्चा केली जात होती. खरं तर हे संपूर्ण प्रकरण संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा (Richa Sharma) यांच्याशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिचा शर्माला कॅन्सर झाला असताना ती काही दिवस अमेरिकेत उपचारासाठी होती. त्याचवेळी संजय दत्त चित्रपटांमध्ये बीजी होता आणि मुंबईत राहत होता. संजय दत्तचे त्या क्षणी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोबत अफेअर सुरू होते. त्यांच्या जवळीकीचे किस्से उद्योग जगतात वणव्यासारखे पसरले होते.

अमेरिकेत उपचार घेत असलेल्या ऋचा शर्मालाही हा प्रकार कळला व त्यानंतर तिने आपले उपचार मध्येच सोडून आपल्या मुलीसह अमेरिकेतून भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इथे आल्यावर रिचाची निराशा झाली. आजाराने त्रस्त असलेल्या रिचाला विमानतळावर घेण्यासाठी संजय आला नव्हता. मात्र मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त अडकल्यानंतर अभिनेत्री माधुरीनेही त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते. संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माने १० डिसेंबर १९९६ रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिचाच्या मृत्यूवेळी संजय तिच्यासोबत नव्हता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड