चॉकलेट बॉय हे नाव ऐकताच तरुणाईच्या डोळ्यासमोर येतो तो एक चेहरा म्हणजे स्वप्निल जोशी. स्वप्निल जोशी हा तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला. स्वप्निल जोशीचे चित्रपट म्हणजे बॅालिवूडमधल्या शाहरुख खान आणि काजोल यांच्यासारखे रोमँटिक चित्रपट.
2014 मध्ये, संजय जाधवच्या "प्यार वाली लव्ह स्टोरी" या चित्रपटात स्वप्निल जोशी सई ताम्हणकर सोबत दिसला होता. ज्या चित्रपटाने रिलीज होताच चांगली ओपनिंग घेतली आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर तो संजय जाधवच्या "तू ही रे" मध्ये सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या सोबत दिसला . दुनियादारी सारखा आपल्याला पुन्हा एकदा कॉलेजच्या कट्ट्यावर घेऊन जाणारा चित्रपट ठरला. त्याचबरोबर भिकारीसारखा अनोखा चित्रपट स्वप्निल जोशी आपल्या भेटीस घेऊन आला.
स्वप्निल जोशी आता नवीन चित्रपट घेऊन प्रक्षेकांच्या भेटीस येत आहे त्या संदर्भात त्यांने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत बातमी दिली. या पोस्टरमध्ये एका बंद दरवाज्याच्या की होलमधून “सुशिला - सुजीत”म्हणजेच स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री काय डोकावतात हे समजण्यासाठी आपल्यालाही १८ एप्रिलला चित्रपटगृहात जाऊन बघावा लागेल.
पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत चित्रपट आहे. यात कथा, दिग्दर्शक, निर्माते प्रसाद ओक आणि मंजिरी ओक आहेत. याआधी प्रसाद ओक यांनी हिरकणी आणि चंद्रमुखी सारखे उत्कृष्ट चित्रपट आपल्या भेटीस आणले.
त्यामुळे दरवाजाच्या आड काय आहे गुपित…???हे बघायला जाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.