Amruta Fadnavis Team Lokshahi
मनोरंजन

उर्फी जावेदवर बोलायला 'का' दिला अमृता फडणवीसांनी नकार

सध्या उर्फी हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.

Published by : shamal ghanekar

सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. या प्रकरणावर अमृता फडणवीस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. या प्रकरणावर नेमक्या काय म्हणाल्या अमृता फडणवीस ....

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतचं अमृता यांचे 'मूड बना लिया है' नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या लॉन्च दरम्यान त्यांना उर्फीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुढे अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मला आज या विषयावर बोलायचे नाही. आज मी माझ्या 'मूड बना लिया है' गाण्यावर बोलणार आहे.

अमृता फडणवीस यांची अनेक गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. याआधी अमृता फडणीस यांचे 'जय लक्ष्मी माता' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे खूप व्हायरलही झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा