Aashram 3  Team Lokshahi
मनोरंजन

'Aashram 3' मध्ये ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन करताना बॉबी देओल का घाबरला?

आश्रम 3 या वेबसिरीजचा तिसरा सीझन खूप चर्चेत राहिला.

Published by : shweta walge

'आश्रम 3' (Aashram 3) या वेबसिरीजचा (webseries) तिसरा सीझन खूप चर्चेत राहिला. पुन्हा एकदा लोकांना बाबा निराला (Baba Nirala) म्हणजेच बॉबी देओलचा अभिनय आवडला. तिसर्‍या सीझनची खास गोष्ट म्हणजे यात अभिनेत्री ईशा गुप्ताने (Isha Gupta) एंट्री घेतली होती. ईशाने तिच्या बोल्डनेसने (Boldness) अनेकांना आश्चर्यचकित केले. ईशा आणि बॉबी देओलच्या वेबसिरीजमझ्ये काही इंटिमेट सीन्स (Intimate scene) देखील होते, जे करणं अभिनेत्याला खूप कठीण वाटलं. होय, खुद्द बॉबी देओलने खुलासा केला आहे की, ईशासोबत बोल्ड सीन्स (Bold scene) करताना तो खूप अस्वस्थ होतो.

बॉबी देओलने (Bobby Deol) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'ईशासोबत इंटिमेट सीन करताना मला खूप अस्वस्थ वाटत होते. मला आठवतंय जेव्हा मी पहिला इंटिमेट सीन केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी पहिल्यांदाच असं काही करत होतो. माझी को-स्टार ईशा गुप्ता खूप प्रोफेशनल होती आणि तीने व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारली. त्यामुळे माझ्यासाठीही हे थोडे सोपे झाले आणि लोकांना हा सीन आवडला. त्याच्यासारखा सहकलाकार असावा. प्रकाश जी यांनी ज्या पद्धतीने हे चित्रीकरण केले आणि टीमने काम केले, त्यामुळेच हा सीन योग्य पद्धतीने पडद्यावर आला आहे.

इंटीमेट सीनवर बोलताना ईशा गुप्ता म्हणाली होती, 'जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत 10 वर्षांपासून काम करत आहात, तेव्हा तुमच्यासाठी हे सर्व अवघड नाही. जेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी विचित्र घडत असेल तेव्हा तुम्हाला या दृश्यांमुळे फरक पडेल. लोकांना इंटिमेट सीनमध्ये खूप समस्या येतात पण मला ते करायला हरकत नाही. मला माझे काम आवडते.'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा